सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत पाटेश्वर पॅनेल बाजी मारणार

आमदार नितेश राणे यांचा विश्वास

सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडी खरेदी- विक्री संघाच्या निवडणुकीत श्री देव पाटेश्वर सहकार परिवर्तन पॅनलचे दत्ताराम कोळमेकर हे बिनविरोध निवडून आल्यानंतर या निवडणुकीत बाजी मारण्याच्या दृष्टीने भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांनी दंड थोपटले आहे आज या पॅनेलचे प्रमुख भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत या पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास येथे व्यक्त केला.ते सावंतवाडीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान पहिली युती ही कोकणात झाली, ‘गुलाल’ देखील कोकणातून उधळणार असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.

भाजप बाळासाहेबांची शिवसेना यांची रणनीती विजयाची आहे. कॉग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे शिवसेनेच्या महाविकास आघाडी ला मतदान करूंन फायदा होणार नाही, हे मतदारांना ठावूक आहे, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे, असा विश्वास आमदार नितेश राणेंनी व्यक्त केला.

दरम्यान शिंदे भाजप सरकार गेल्या तीन महिने शेतकऱ्यांसाठी विविध निर्णय घेतले आहेत तसेच केंद्र सरकारने देखील विविध योजना शेतकऱ्यांसाठी राबवलेत त्यामुळे नक्कीच मतदार आम्हाला साथ देतील असाही विश्वासा ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी ,महेश सारंग ,संजू परब, अनोरोजीन लोबो ,अशोक दळवी ,रवि मडगावकर आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page