मालवण : (प्रतिनिधी)
मालवण तालुका नाभिक संघटनेच्यावतीने नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संतशिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी सोहळा २०२६ मंगळवार दि. ८ सप्टेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे आयोजन बाजारपेठेतील भैरवी मंदिर येथे करण्यात आले आहे.
यानिमित्ताने सकाळी ९ वाजता सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, ७९.३० वाजता आरती व तीर्थप्रसाद, १० वाजता ह.भ.प. धामापूरकर गुरुजी यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी १२ वाजता गुणवंत मुलांचा सत्कार समारंभ, त्यानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता बाळगोपाळ मंडळ आचरा यांचे भजन होणार असून, रात्री ८ वाजता विश्वकर्मी प्रासादिक भजन राठीवडे यांचे भजन सादर होणार आहे. भजनामध्ये बुवा मंदार आचरेकर व बुवा अक्षय परुळेकर सहभागी होणार आहेत.
यानिमित्ताने आयोजित स्वागत समारंभासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण तसेच समाजातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक करण्यात येणार आहे. मालवण तालुका नाभिक संघटनेचे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ मुंबई शाखा मालवण तसेच नाभिक समाजाच्यावतीने सर्व समाजबांधवांनी सहकुटुंब उपस्थित राहवे, असे आवाहन तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण यांनी केले आहे.
या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी तालुक्यातील सर्व सलून व्यवसाय बंद ठेवण्यात येणार असल्याचेही आयोजकांनी कळविले आहे
