निशाण तलावाची उंची वाढविण्याच्या कामाचे शनिवारी लोकार्पण

⚡वेंगुर्ला ता.०३-: गेली २० वर्षे वेंगुर्ला शहराला भेडसावणारा मुख्य प्रश्न म्हणजे पाणी टंचाई. हीच पाणी टंचाई दूर करून वेंगुर्ला शहराला टँकर मुक्त करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगराध्यक्ष दिलीप गिरप व नगरसेवकांनी सात्ययाने प्रयत्न केल्याने येथील निशाण तलावाची उंची वाढवण्यात येऊन जीर्ण पाईपलाईन सुद्धा बदलण्यात आल्या आहेत. या वेंगुर्ला शहर नळपाणी पुरवठा योजना टप्पा २, निशाण तलावाची उंची २.५ मीटरने वाढवणे या कामाचे लोकार्पण पालकमंत्री रविद्र चव्हाण यांच्या हस्ते ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार असल्याची माहिती भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी दिली आहे.

   पिराचा दर्गा येथील भाजप तालुका कार्यालयात पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांच्यासह भाजपाचे साईप्रसाद नाईक, बाबली वायांगणकर, रविंद्र शिरसाट, दादा केळूसकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना देसाई म्हणाले की, वेंगुर्ला नगरपरिषदेच्या २०१६ च्या सार्वत्रिक निवडणूकित शहराला २४ तास पाणीपुरवठा करू असे वचन दिले होते आणि या वाचनाची पूर्तता झाली आहे. माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप व त्यांचे सर्व सहकारी यांनी गेल्या ५ वर्षात शहरात केलेली विकासकामे ही सर्व जनतेच्या समोर आहेत आणि जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता या ५ वर्षाच्या कारकिर्दीत केली याचे समाधान आहे. 

  त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून ही नळपाणी पुरवठा योजना पूर्ण झाली. त्यावेळी आमदार असलेले व आताचे पालकमंत्री रविद्र चव्हाण यांनी या योजनेसाठी पाठपुरावा केला होता. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सुद्धा मंत्रालयात याबाबत होणा-या बैठकांत सहभाग घेतला होता आणि याचेच फलित म्हणून टँकर मुक्त वेंगुर्लाच्या दिशेने सध्या शहराची वाटचाल सुरू आहे.
You cannot copy content of this page