करूळ घाटाबाबत अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही

आ नितेश राणे यांचा इशारा

वैभववाडी संजय शेळके
करूळ घाटाबाबत बाबत आज प्रत्येक पर्यटक व वाहनचालक तक्रार करत आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच घाटाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तुम्ही सर्व अधिकारी या दुरावस्थेला जबाबदार आहात. कामचुकार अधिकाऱ्यांची अजिबात गय करणार नाही. अधिकाऱ्यांच्या मानेवर बसून संपूर्ण घाट मार्गाचे काम करून घेणार असे खडे बोल आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी श्री जाधव यांना सुनावले. पुढील दोन दिवसात घाट रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल. असे कार्यकारी अभियंता जाधव यांनी आमदार नितेश राणे यांना सांगितले.


आमदार नितेश राणे यांनी करूळ घाट मार्गाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात अनेक पर्यटक व वाहनचालकानी घाटाच्या झालेल्या दयनीय अवस्थेबाबत तक्रार केली. या मार्गाचे काम ताबडतोब चालू करा. कनिष्ठ अधिकारी ऐकत नसेल तर उपयोग काय? उपकार्यकारी अभियंता शिवनिवार हे पाट्या टाकायचे काम करत आहेत. त्यांनी कितीही पळ काढला तरी ते सापडणारच. असे आमदार राणे यांनी सुनावले. घाट मार्गात अपघात झाला तर जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. पर जिल्ह्यातील ठेकेदाराला काम दिल्यामुळे घाटाची अवस्था वाईट होत आहे. दर्जेदार काम करणारे अधिकाऱ्यालाच निविदा द्या अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी दिल्या. घाटातील गटारांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. घाटमार्गाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची मस्ती उतरवील्याशिवाय राहणार नाही. अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकांचे खापर आमच्यावर का? तुमची सर्व कामे आम्हीच करायची का? असा सवाल ही नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना केला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासिर काझी, माजी सभापती जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, राजेंद्र राणे, हुसेन लांजेकर, किशोर दळवी, सुनील रावराणे, सज्जनकाका रावराणे, रज्जब रमदुल, बंडया मांजरेकर, उदय पांचाळ, सुनील भोगले आदी कार्यकर्ते व संबंधित खात्याचे खाते प्रमुख उपस्थित होते.
फोटो – करूळ घाटाची पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना करताना आमदार नितेश राणे. यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकारी व अधिकारी छाया संजय शेळके वैभववाडी

You cannot copy content of this page