⚡कणकवली ता.०३-:
श्रीदेव रामेश्व मंदिर भिरवंडे येथे सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी ११ हजार १११ दिव्याचा दिपोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे रामेश्वर मंदिर हजारे दिव्याने उजळून निघनार आहे. यासाठी भाविकांना दीपदान करण्याची संधी मिळणार आहे. दिपोत्सव रात्री साडेआठ वाजता होणार असून त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्रिपुरारी पौर्णिमेला भिरवंडे रामेश्वर मंदिरात प्रतिवर्षी साजरा होणारा दिपोत्सव यंदा ७ नोव्हेंबरला साजरा होणार आहे. भाविकांना तेल आणि तुपाचा दिवा श्रीदेव रामेश्वर चरणी अर्पण करण्याची संधी मिळणार आहे. आपल्या जिवणात वर्षेभर आनंद रहावा अशी प्रार्थना श्रीदेव रामेश्वर चरणी करण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे आवाहन देवालये संचालक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे. सह्याद्रीच्या कुशीत भिरवंडे गाव वसलेला आहे. निर्सगाने नटलेल या गावाचे ग्रामदैवती श्रीदेव रामेश्वराव भाविकांची अपार श्रध्दा आहे. दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला साजरा होणाऱ्या दीपोत्सवात शेकडो भाविक सहभागी होतात. यंदा दिपोत्सवानंतर रात्री साडेनऊ वाजता चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ येथील जलवा २०२२ कलागुणांचा हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. रामेश्वर मंदिरात दीपदान करवयाचे असल्यास सोबतच्या खाते नंबरमध्ये रक्कम जमा करावी, देवालये संचालक मंडळ भिरवंडे -IFSCOAD-SIDC0001007, account number 007400000000136 शाखा सांगवे येथे जमा कारावी
भिरवंडे रामेश्वर मंदिरात ११ हजार १११ दिव्याचा दिपोत्सव साजरा होणार
