मालवणच्या ग्रामदैवतांचा दीपोत्सव व श्री देव नारायणाचा जत्रोत्सव ७ रोजी
⚡मालवण ता.०४-: मालवणच्या ग्रामदैवते श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण, श्री देवी सातेरी, श्री देवी पावणाई, श्री देवी भावई यांचा वार्षिक दिपोत्सव व श्री देव नारायणाचा जत्रोत्सव सोमवार दि. ७ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव व दीपोत्सव दिवशी दुपारी समाराधना, रात्रौ ९.३० वाजता पुराणवाचन सांगता, त्यानंतर मंदिर व मंदिराच्या कळसावर कोहाळ्याचे दिवे…
