कुर्ली येथे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

वैभववाडी संजय शेळके
“मानव सेवा हीच ईश्वर सेवा ” या उक्तीप्रमाणे सामाजिक बांधीलकी जपण्यासाठी समस्त कुर्ली ग्रामस्थाच्या सहकार्याने रक्तदान शिबीर चे आयोजन शिवप्रेरणा युवा मित्र मंडळ मुंबई, कुर्ली व राजेश मो पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने त्रिपुरारी जत्रोत्सव पूर्वी रविवार दि. ०६ नोव्हेंबर रोजी ठीक सकाळी १०:०० तें दुपारी ०१:०० या वेळात वडाचे भरड (जत्रोत्सव ) ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे .

        गेली ३ वर्ष शिव प्रेरणा टीम च्या वतीने विविध समाजउपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रक्तदान सारखा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे.त्या साठी समस्त युवा वर्ग असो व त्याच बरोबर सर्वच स्तरातील लोकांचे सहकार्य या कार्यक्रमास दरवर्षी लागत आहे. म्हणून गेली अनेक वर्षं शिवप्रेरणा टीम च्या वतीने आरोग्य शिबिर सारखे विविध उपक्रम राबवले जात आहेत. 
म्हणून याही वर्षी रक्तदान शिबिर ठिकाणी लकी ड्रॉ च्या माध्यमातून वेगवेगळी बक्षीसे देण्यात येणार आहेत. व प्रत्येक रक्तदात्यास रोपे भेट म्हणून  देण्यात येणार आहेत तरी गावातील व उपस्थित सर्व तरुणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी. आपण दिलेले हे लाल सोन दुसऱ्याच्या आयुष्यात सोनेरी क्षण आणत असतं म्हणुनच *रक्तदान करा जीवन दाते व्हा.* असे आव्हान *शिव प्रेरणा युवा मित्र मंडळ मुंबई (कुर्ली).* यांच्या टीम कडून करण्यात आले आहे
You cannot copy content of this page