⚡कणकवली ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन शाखा कणकवलीची सभा भालचंद्र महाराज संस्थान भक्तनिवास येथे चंद्रकांत तेली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश दळवी, जिल्हा सरचिटणीस सुंदर पारकर, ज्येष्ठ मार्गदर्शक केशव जाधव, बळीराम आडेलकर उपस्थित होते. तालुका सचिव अनिलकुमार माळवदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
प्रमुख मार्गदर्शक प्रकाश दळवी यांनी कणकवली शाखेच्या कामाचा आढावा घेतला. कणकवली तालुक्यात प्रलंबित कामांचा निपटारा चांगला झालेला आहे. सेवा पुस्तकांच्या सुरक्षिततेसाठी पं.स. शिक्षण विभागाला २ कपाटे देण्याचे ठरविण्यात आले होते. याबाबत अध्यक्षांनी आवाहन करताच सुमारे ६० सभासदांनी देणगी दिली. याबद्दल जिल्ह्याच्यावतीने धन्यवाद दिले. वारस नोंदणी फॉर्मचे वाटप केले आहे ते एकत्रितपणे कार्यालयाला सादर करावेत. कणकवली शाखेची कार्यपद्धती व सभासदांचा विश्वास व एकजुट आदर्शवत आहे.असे ते म्हणाले.
सुंदर पारकर यांनी लाक्षणिक उपोषणाबाबत माहिती दिली व कणकवली शाखेच्या कामाचे कौतुक केले. तालुकाध्यक्ष श्चंद्रकांत तेली यांनी तालुक्याच्या विविध प्रश्नांबाबत माहिती दिली. सचिव अनिल माळवदे यांच्या उत्तम योगदानाबाबत अभिनंदन केले. सदर सभेला सुमारे ७० सभासद उपस्थित होते. सभेच्या यशस्विततेसाठी गणपत मालंडकर, गजानन उपरकर, विजय पारकर, विलास मुद्राळे, भिवा राणे व सहकाऱ्यांनी उत्तम योगदान दिले.
