Headlines

Global Maharashtra Breaking News

सालईवाडा येथील गटार कामाची सुधीर आडिवरेकर यांनी केली पाहणी

सहकारी सुद्धा होते उपस्थित;बांधकाम अधिकाऱ्यांना दिल्या सूचना सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील सालईवाडा भागात सुरु असलेल्या गटार योजनेच्या कामाची पहाणी माजी आरोग्य सभापती तथा स्थानिक नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत केली. यावेळी बांधकाम अधिकारी गजबार यांना त्या संदर्भातल्या सुचना दिल्या. संजू परब नगराध्यक्ष असताना त्यांच्या माध्यमातून व सुधीर आडिवरेकर यांच्या पाठपुराव्यानंतर हे काम मंजूर झालं…

Read More

नगर परिषदेत कायमस्वरूपी अभियंता नियुक्त करा

पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे  राजू बेग व दिपाली भालेकर यांची मागणी सावंतवाडी ता.३०-: नगरपरिषद अभियंता या पदावर कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष राजू बेग माजी नगरसेविका दिपाली भालेकर व भाजप शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे. सध्या सावंतवाडी नगरपरिषद कार्यक्षेत्रात बांधकामाची अनेक कामे सुरू असून सदर…

Read More

निबंध लेखन स्पर्धेत लोचन भगत विजेती

समता पर्व अंतर्गत श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत करण्यात आले होते स्पर्धेचे आयोजन ⚡देवगड ता.३०-: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ संविधान दिन ते ६ डिसेंबर २०२२ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीतील समता पर्वा मध्ये जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेत माध्यमिक…

Read More

पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल ⚡सिंधुदुर्गनगरी ता.३०-: पोलीस भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त उमेदवारांना सहभागी होता यावे, या दृष्टीकोनातून पोलीस भरती प्रक्रियेतील अर्ज सादर करावयाची मुदत दिनांक १५ डिसेंबर २०२२ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली. पोलीस भरती २०२१ मधील पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात…

Read More

खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद गावडे, उपाध्यक्ष रघुनाथ रेडकर

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली घोषणा; ⚡सावंतवाडी ता.३०-: येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदाची निवडणूक आज असून चेअरमन पदासाठी भाजपचे प्रमोद गावडे तर व्हाईस चेअरमन पदासाठी बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे संचालक रघुनाथ उर्फ राजन रेडकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी ही नावे जाहीर…

Read More

सिंधुदुर्ग पॉवरलिफ्टींगच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

⚡वेंगुर्ला ता.३०-: इंडियन पॉवरलिफ्टींग फेडरेशन व महाराष्ट्र पॉवरलिफ्टींग असोसिएशन यांच्या मान्यतेने अहमदनगर पॉवरलिफ्टींग असोसिएशनद्वारा अहमदनगर येथे २६ व २७ नोव्हेंबरला पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर, ज्युनिअर, सिनियर, मास्टर (अनइक्युप) पुरुष व महिला राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा पॉवरलिफ्टींगच्या खेळाडूंनी ३ सुवर्ण, १ रजत व ३ कांस्य पदके पटकावित उत्कृष्ट चमकदार कामगिरी बजावली.६० किलो वजनी…

Read More

जलतरण स्पर्धेत पार्थ परबचे यश

⚡वेंगुर्ला ता.३०-: क्रिडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय १४ वर्षाखाली जलतरण व डायव्हिंग या स्पर्धेत वेंगुर्ला प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या पार्थ प्रविण परब (इ.८वी) याने यश संपादन केले.पार्थ याने जलतरण स्पर्धेत २०० मी. फ्रि स्टाईलमध्ये प्रथम क्रमांक, १०० मी. फ्रि स्टाईलमध्ये प्रथम…

Read More

तालुकास्तरीय वाचक स्पर्धेत प्रसाद खडपकर प्रथम

⚡वेंगुर्ला ता.३०-: वेंगुर्ला नगरवाचनालय आणि सिधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने २७ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला तालुकास्तरीय वाचक स्पर्धा संपन्न झाली. अतिशय चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत प्रसाद विश्वनाथ खडपकर, विद्या सुनिलदत्त परब आणि विशाखा विलास वेंगुर्लेकर यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक प्राप्त केले. दि. ४ डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर होणा-या वाचक स्पर्धेसाठी या तिन्ही विजेत्यांची निवड…

Read More

समुहनृत्य स्पर्धेत शिवाजी प्रागतिक शाळा अंगणवाडी प्रथम

⚡वेंगुर्ला ता.३०-: वेंगुर्ला नगरवाचनालय संस्थेतर्फे कै.सौ.शुभदा अविनाश शेणई स्मृतिप्रित्यर्थ शहर मर्यादित अंगणवाडी व बालवाडीतील मुलांसाठी घेतलेल्या समुहनृत्य स्पर्धेत शिवाजी प्रागतिक शाळेच्या अंगणवाडीने प्रथम, शेणई बालवाडीने द्वितीय तर कुंभवडे-सुंदरभाटले अंगणवाडी व वेंगुर्ला नं. ३ अंगणवाडीने तृतीय क्रमांक पटकाविला.ही स्पर्धा २६ नोव्हेंबर रोजी संस्थेच्या कै.केशवराव अंकुश कुबल रंगमंचावर पार पडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सौदागर यांनी केले. परीक्षक…

Read More

संविधान दिवस संपन्न

⚡वेंगुर्ला ता.३०-: राष्ट्रीय सेवा योजना आणि सांस्कृतिक कमिटी यांच्यावतीने संविधान दिनानिमित्त नायब तहसिलदार संदिप पाणमंद यांच्या प्रमुख उपस्थितीत बॅ.खर्डेकर महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. प्रा.नंदगिरीकर यांनी संविधानाचे महत्त्व सांगून शपथ दिली.या कार्यक्रमांतर्गत १८ वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी केली. या कार्यक्रमाला प्राचार्य विलास देऊलकर, प्रा.व्ही.व्ही.सावंत, प्रा.देशपांडे, प्रा.शितोळे, प्रा.चुकेवाड, प्रा.विनोद पवार, प्रा. अरविद बिराजदार…

Read More
You cannot copy content of this page