⚡वेंगुर्ला ता.३०-: वेंगुर्ला नगरवाचनालय आणि सिधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने २७ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला तालुकास्तरीय वाचक स्पर्धा संपन्न झाली. अतिशय चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत प्रसाद विश्वनाथ खडपकर, विद्या सुनिलदत्त परब आणि विशाखा विलास वेंगुर्लेकर यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक प्राप्त केले. दि. ४ डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर होणा-या वाचक स्पर्धेसाठी या तिन्ही विजेत्यांची निवड झाली आहे.
वेंगुर्ला येथील या स्पर्धेसाठी मधुमंगेश कर्णिक यांची कोणतीही साहित्यकृती हा विषय ठेवण्यात आला होता. यात प्रसाद खडपकर यांनी ‘देवकी‘ पुस्तकाचे, विद्या परब यांनी ‘उत्तरायण‘ तर विशाखा वेंगुर्लेकर यांनी ‘माहिमची खाडी‘ या पुस्तकावर परीक्षण केले. या स्पर्धेची पारितोषिके नगरवाचनालयाचे कार्योपाध्यक्ष राजेश शिरसाट यांनी पुरस्कृत केली होती. स्पर्धेचे परीक्षण अनिल सौदागर, कैवल्य पवार आणि प्रा.महेश बोवलेकर यांनी केले.
तालुकास्तरीय वाचक स्पर्धेत प्रसाद खडपकर प्रथम
