⚡वेंगुर्ला ता.३०-: क्रिडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय १४ वर्षाखाली जलतरण व डायव्हिंग या स्पर्धेत वेंगुर्ला प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या पार्थ प्रविण परब (इ.८वी) याने यश संपादन केले.
पार्थ याने जलतरण स्पर्धेत २०० मी. फ्रि स्टाईलमध्ये प्रथम क्रमांक, १०० मी. फ्रि स्टाईलमध्ये प्रथम क्रमांक, ५० मी. फ्रि स्टाईल या प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त करत यश संपादन केले. त्याची शालेय विभागीय स्तरावर होणाया जलतरण स्पर्धसाठी निवड झाली. त्याच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, चेअरमन डॉ.मंजिरी देसाई-मोरे, मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
फोटो – पार्थ परब
जलतरण स्पर्धेत पार्थ परबचे यश
