⚡वेंगुर्ला ता.३०-: इंडियन पॉवरलिफ्टींग फेडरेशन व महाराष्ट्र पॉवरलिफ्टींग असोसिएशन यांच्या मान्यतेने अहमदनगर पॉवरलिफ्टींग असोसिएशनद्वारा अहमदनगर येथे २६ व २७ नोव्हेंबरला पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर, ज्युनिअर, सिनियर, मास्टर (अनइक्युप) पुरुष व महिला राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा पॉवरलिफ्टींगच्या खेळाडूंनी ३ सुवर्ण, १ रजत व ३ कांस्य पदके पटकावित उत्कृष्ट चमकदार कामगिरी बजावली.
६० किलो वजनी गटात सिंधुदुर्गच्या कैलास पवारला सुवर्णपदक व मानाची महाराष्ट्र पॉवरलिफ्टींग स्ट्राॅंग मॅन ट्राॅफी, ७८ किलो वजनी गटात हंबीरराव देसाईला सुवर्णपदक, ८३ किलो वजनी गटात सुरज शेलारला सुवर्णपदक, ८७ किलो वजनी गटात शौर्य जितेंद्र महाडीकला रजत पदक, ६४ किलो वजनी गटात यश आडोलिकरला कांस्य पदक, ५७ किलो वजनी गटात अभिजित कांबळे व संजय गुरवला कांस्य पदक मिळाले.
या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पॉवरलिफ्टींग खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग खेळाडू व सिंधुदुर्ग जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सेक्रेटरी दिलीप नार्वेकर व कोच वैभव मुद्राळे, हेल्थझोन कासार्डे यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व विजेत्यांची जानेवारी २०२३ ला होणा-या आगामी राष्ट्रीय स्तरावरील पॉवरलिफ्टींग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व विजेत्यांचे अध्यक्ष पुष्कराज कोले, उपाध्यक्ष राजू बेग, राजेश घाटवळ, प्रविण नाईक, गणेश मर्गज, आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टींग खेळाडू कल्पना सावंत, विनायक नवार, बॉडी टेम्पलचे प्रविण गुरव, सावंतवाडीचे मंगेश घोगळे, सिद्धेश नाईक, दिपक राऊळ यांनी अभिनंदन केले आहे.
फोटोओळी – अहमदनगर येथे झालेल्या पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सिधुदुर्गच्या पॉवरलिफ्टींग खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.
सिंधुदुर्ग पॉवरलिफ्टींगच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी
