खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद गावडे, उपाध्यक्ष रघुनाथ रेडकर

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली घोषणा;

⚡सावंतवाडी ता.३०-: येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदाची निवडणूक आज असून चेअरमन पदासाठी भाजपचे प्रमोद गावडे तर व्हाईस चेअरमन पदासाठी बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे संचालक रघुनाथ उर्फ राजन रेडकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी ही नावे जाहीर केली.

सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघावर भारतीय जनता पार्टी व बाळासाहेब यांची शिवसेना युतीची निर्विवाद सत्ता असून पंधरापैकी पंधरा संचालक हे युतीचेच असल्याने चेअरमन व्हाईस चेअरमन निवड बिनविरोध होणार आहे.

You cannot copy content of this page