⚡वेंगुर्ला ता.३०-: वेंगुर्ला नगरवाचनालय संस्थेतर्फे कै.सौ.शुभदा अविनाश शेणई स्मृतिप्रित्यर्थ शहर मर्यादित अंगणवाडी व बालवाडीतील मुलांसाठी घेतलेल्या समुहनृत्य स्पर्धेत शिवाजी प्रागतिक शाळेच्या अंगणवाडीने प्रथम, शेणई बालवाडीने द्वितीय तर कुंभवडे-सुंदरभाटले अंगणवाडी व वेंगुर्ला नं. ३ अंगणवाडीने तृतीय क्रमांक पटकाविला.
ही स्पर्धा २६ नोव्हेंबर रोजी संस्थेच्या कै.केशवराव अंकुश कुबल रंगमंचावर पार पडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सौदागर यांनी केले. परीक्षक म्हणून प्रा.महेश बोवलेकर, माया परब यांनी काम पाहिले. या स्पर्धेला श्रीनिवास सौदागर यांच्यासह अंगणवाडी ताई, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना तसेच तीन अंगणवाडी ताईंना जानेवारी २०२३ मध्ये गौरविण्यात येणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी दिली.
समुहनृत्य स्पर्धेत शिवाजी प्रागतिक शाळा अंगणवाडी प्रथम
