⚡वेंगुर्ला ता.३०-: राष्ट्रीय सेवा योजना आणि सांस्कृतिक कमिटी यांच्यावतीने संविधान दिनानिमित्त नायब तहसिलदार संदिप पाणमंद यांच्या प्रमुख उपस्थितीत बॅ.खर्डेकर महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. प्रा.नंदगिरीकर यांनी संविधानाचे महत्त्व सांगून शपथ दिली.
या कार्यक्रमांतर्गत १८ वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी केली. या कार्यक्रमाला प्राचार्य विलास देऊलकर, प्रा.व्ही.व्ही.सावंत, प्रा.देशपांडे, प्रा.शितोळे, प्रा.चुकेवाड, प्रा.विनोद पवार, प्रा. अरविद बिराजदार उपस्थित होते.
संविधान दिवस संपन्न
