पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे राजू बेग व दिपाली भालेकर यांची मागणी
सावंतवाडी ता.३०-: नगरपरिषद अभियंता या पदावर कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष राजू बेग माजी नगरसेविका दिपाली भालेकर व भाजप शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
सध्या सावंतवाडी नगरपरिषद कार्यक्षेत्रात बांधकामाची अनेक कामे सुरू असून सदर कामे सुरळीतपणे पार पडण्यासाठी कायमस्वरूपी अभियंता आवश्यक आहे, त्यासाठी आपण याची नियुक्ती करावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
