निबंध लेखन स्पर्धेत लोचन भगत विजेती

समता पर्व अंतर्गत श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत करण्यात आले होते स्पर्धेचे आयोजन

⚡देवगड ता.३०-: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ संविधान दिन ते ६ डिसेंबर २०२२ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीतील समता पर्वा मध्ये जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेत माध्यमिक गटात कुमारी. लोचन मनोहर भगत प्रथम क्रमांक, कुमारी. दुर्वा संतोष साळुंखे द्वितीय क्रमांक ,तर कुमारी .न्याहारिका चंदन घाडी हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांना . सुनील जाधव व विनायक जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट अजितराव गोगटे सचिव प्रवीण जोग ,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.दीपा मराठे यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page