Headlines

Global Maharashtra Breaking News

वैश्यसमाज वसतिगृहाच्या पाच खोल्या आपण उभारणार

निधी संकलन करून देणार:मत्री दीपक केसरकर; वैश्य मेळाव्यात मंत्री केसरकर यांचा सत्कार ⚡सावंतवाडी ता.१२-: येथील वैश्य समाजाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या वस्तीगृहाच्या पाच खोल्या माझ्या कुटुंबांतर्फे बांधून देण्यात येतील अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.दरम्यान त्यासाठी लागणाऱ्या देणगी मी उपलब्ध करून देईन असे आश्वासन श्री केसरकर यांनी यावेळी दिली. ते…

Read More

होळीच्या खुंटावर यापुढे आठवडा हलविणार…

मोती तलाव सुंदर राखण्यासाठी निर्णय;शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.१२-: येथील आठवडा बाजाराबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून होळीच्या खुंटावर या पुढच्या काळात आठवडा बाजार भरवला जाईल अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिली. दरम्यान स्थानिक व्यापारी वर्गाला याचा त्रास होता नये व तलावाचा काठ सुंदर बनवला आहे. पुर्वीच्या काळात या ठिकाणी…

Read More

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर,

रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल  ⚡मुंबई दि.१२-: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे.याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी…

Read More

महाविद्यालयीन विद्यार्थींनीची मोबाईल सह सॅग चोरणारा पोलीसांच्या जाळ्यात

मोबाईल लोकेशन द्वारे एकजण ताब्यात ⚡कुडाळ ता.११-: प्रॅक्टिकल वर्गाच्या बाहेर ठेवलेली सॅग चोरीतील संशयिताला कुडाळ पोलिसांनी अखेर मोबाईल लोकेशन द्वारे पकडण्यात यश मिळवले आहे. याप्रकरणी तुषार उर्फ शंकर श्रीराम माळकर (वय ३०, रा. कारिवडे पेडवेवाडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Read More

निरवडे ग्रा पं सदस्य दशरथ मल्हार यांच्यासह माजी सदस्यांचा ठाकरे सेनेत प्रवेश

तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचा भाजप शिंदे सेनेला धक्का;असंख्य नागरिकांनीही बांधले शिवबंधन ⚡सावंतवाडी ता.११-: निरवडे येथील विद्यमान सदस्य दशरथ मल्हार यांच्यासह माजी सदस्य यांनी आज उद्धव ठाकरे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना शिवबंधन बांधून स्वागत करण्यात आले. दरम्यान भाजप व…

Read More

वैश्य समाजाच्या शोभायात्रेला सावंतवाडीत उस्फुर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.११-: वैश्यवाणी समाज सावंतवाडी आणि वैश्यवाणी समाज कमिटी सिंधुदुर्ग यांच्या वतीने शतक महोत्सवी वर्षाच औचित्य साधून सावंतवाडी शहरात भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत सर्वेश भिसे कणकवली महिला आणि पुरुष यांच्या ढोल पथक व नेरुर येथील चित्ररथांनी लक्ष वेधल. वैश्यवाणी समाज सावंतवाडी आणि वैश्यवाणी समाज कमिटी सिंधुदुर्ग यांच्या वतीने शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त ३५…

Read More

तारकर्ली रांज नाल्यावरील पुलाचे काम तात्काळ सुरू न केल्यास आमरण उपोषण – सुरेश बापार्डेकर

⚡मालवण ता.११-:पर्यटन गाव असलेल्या तारकर्ली मधील रांज नाल्यावरील पुलाचे काम अपुऱ्या अवस्थेत गेले काही महिने बंद आहे. काम पूर्ण नं झाल्याने वाहतुकीस खोळंबा होत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात पुलाच्या उर्वरित बांधकामाला तसेच रांज नाल्यातील गाळ काढण्यास तात्काळ सुरुवात न केल्यास मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर १५ फेब्रुवारी रोजी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा तारकर्लीचे…

Read More

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये फार्मसीवरील पाचव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन…

विविध तज्ञांसह देशभरातून सातशे विद्यार्थी होणार सहभागी… ⚡सावंतवाडी ता.११-: येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये रविवार 12 फेब्रुवारी रोजी ‘वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्रातील विज्ञान’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद संपन्न होत आहे. कॉलेजमार्फत आयोजित करण्यात येणारी फार्मसीवरील ही पाचवी राष्ट्रीय परिषद असून यामध्ये संपूर्ण देशभरातून सुमारे सातशे विद्यार्थी व अध्यापक सहभागी होणार आहेत. या परिषदेसाठी…

Read More

शिबीर युवकांमधील ‘स्व’ची जाणीव निर्माण करणारे :मोहन चव्हाण

⚡कणकवली ता.११-: समाज घडविण्यासाठी सक्षम नागरिक निर्माण होणे महत्त्वाचे असते आणि त्यासाठी अशी वैचारिक शिबिरे राबविली जाणे गरजेचे आहे. नेहरू युवा केंद्र आणि यारा फाउंडेशनमार्फत राबविण्यात येणारे हे शिबीर युवकांमधील ‘स्व’ची जाणीव निर्माण करणारे आणि समाज घडविणारे आहे. या शिबिरातून मिळणाऱ्या अनुभवाचा फायदा आपण आपल्या कुटुंबाला, राज्याला आणि पर्यायाने देशाला करून द्यावा, असे आवाहन पोलीस…

Read More

कणकवली सिद्धार्थनगर येथे अंगणवाडीचे उद्घाटन

⚡कणकवली ता.११-; कणकवली सिद्धार्थनगर येथे नगरपंचायत कणकवली यांच्या मार्फत बांधण्यात आलेल्या अंगणवाडीचे उद्घाटन कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी वाडीतील रहिवाशी सुनील हिंदळेकर व सिकंदर जाधव यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे स्वागत केले.सौ.प्रतीक्षा कांबळे यांनी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचे स्वागत केले. अंगणवाडी सेविका सौ.सुर्वे यांचे स्वागत…

Read More
You cannot copy content of this page