होळीच्या खुंटावर यापुढे आठवडा हलविणार…

मोती तलाव सुंदर राखण्यासाठी निर्णय;शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

⚡सावंतवाडी ता.१२-: येथील आठवडा बाजाराबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून होळीच्या खुंटावर या पुढच्या काळात आठवडा बाजार भरवला जाईल अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिली.

दरम्यान स्थानिक व्यापारी वर्गाला याचा त्रास होता नये व तलावाचा काठ सुंदर बनवला आहे. पुर्वीच्या काळात या ठिकाणी स्टॉल होते. ते काढून सुंदर केलेला हा काठ आठवडा बाजारामुळे विदृप दिसायला लागतो. मोती तलाव हे सावंतवाडीच हृदय आहे. त्यामुळे तलाव विदृप होण हे मला कधीही आवडणार नाही. त्यामुळे लवकरच हा बाजार हलविण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत,असे केसरकर यावेळी बोलताना म्हणाले.

You cannot copy content of this page