निरवडे ग्रा पं सदस्य दशरथ मल्हार यांच्यासह माजी सदस्यांचा ठाकरे सेनेत प्रवेश

तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचा भाजप शिंदे सेनेला धक्का;असंख्य नागरिकांनीही बांधले शिवबंधन

⚡सावंतवाडी ता.११-: निरवडे येथील विद्यमान सदस्य दशरथ मल्हार यांच्यासह माजी सदस्य यांनी आज उद्धव ठाकरे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना शिवबंधन बांधून स्वागत करण्यात आले. दरम्यान भाजप व शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केल्याने तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी भाजप शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे.

You cannot copy content of this page