मडुऱ्यात शॉर्टसर्किटमुळे काजू बागायतीला आग
⚡बांदा ता.१७-: महावितरण अधिकार्यांच्या गलथानपणाचा फटका शेतकर्यांना बर्याच वेळा सहन करावा लागतो. असाच प्रकार मडुरा डीगवाडी येथे घडला आहे. शॉर्टसर्किटमुळे ठिणगी उडून शेतकरी प्रकाश वालावलकर यांच्या आंबा व काजू बागायतीला आज दुपारी आग लागली. मात्र, वालावलकर कुटुंबियांच्या अथक प्रयत्नांमुळे आग तातडीने विझविण्यात यश आले. महावितरण अधिकार्यांच्या कामचुकारपणा बद्दल प्रकाश वालावलकर यांनी संताप व्यक्त केला. …
