⚡सावंतवाडी ता.१७-: कोलगाव येथील अंगणवाडी नंबर ३ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त लहान मुलांसाठी वेशभुषा स्पर्धा घेण्यात आली. यावेळी १८ मुलांनी सहभाग दर्शविला. शिवाजी महाराज, जिजामाता, बाजी प्रभू, सईबाई, येसूबाई अशी विविध रूपे मुलांनी साकारली, जय शिवाजी जय भवानी, हर हर महादेव च्या घोषणांनी प्रत्येक मुलांनी आपली कला सुंदर रित्या हावभावा सहित सादर केली.
यावेळी सौ.अपर्णा कोठावळे यांनी बालशिवाजीची कथा सांगुन आपण देखिल त्यांचे योग्य आचरण करावे तसेच अभ्यसासोबत खेळ, वाचन, पाठांतर या गोष्टी देखिल आयुष्याच्या महत्वाच्या आहेत हे पटवुन दिले. अंगणवाडी शाळेसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्यांनी भेट दिली तसेच सर्व मुलांना शालेय उपयोगी साहित्य व खाऊ वाटप देखिल केलें.
वेशभषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आरोही लक्षुमन धूरी, दुसरा क्रमांक ऋव्हीं प्रसाद कदम, तिसरा क्रमांक मानसी कृष्णा जाधव तर उत्तेजनार्थ महादेव संज्य धुरी व कलश गोविंद चव्हाण या मुलांना मिळाला. यावेळी कु.अदिती प्रशांत कोठावळे व अंगणवाडी शिक्षिका सौ परणिका कांबळे याचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच मदतनीस सौ दळवी, आशा ताई सौ, गोवेकर व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. प्रस्तावना सौ परणीका कांबळे यांनी केले.
