⚡देवगड ता.१७-: देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रौत्सवा करीता सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन सज्ज झाले
असून उपविभागीय पोलीस अधिकारी १ पोलीस निरीक्षक ६ सहाय्यक पोलीस निरीक्षक ६ पोलीस उपनिरीक्षक १० असे एकूण २३ पोलीस अधिकारी आणि पुरुष व महिला पोलीस कर्मचारी १३० एकूण १५३ पोलीस अधिकारी कर्मचारी, याबरोबरच होमगार्ड १०८ आणि आरसीपी जवान यांची ३० जणांची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे यात्रा उत्सव काळात वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरिता हॉटेल अस्मि पार्किंग , तसेच एमटीडीसी कुणकेश्वर पार्किंग व सुकेतळे शिव सागर कुणकेश्वर असे ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत .
