देवगड
महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन आयोजित विशेष समारंभ ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय नवदुर्गा सन्मान सामाजिक बालशिक्षण क्षेत्रातील यशस्वी आदर्श नवदुर्गा नडगिवे खारेपाटण येथील आदर्श शिक्षिका सौ.तेजश्री विजय भोकरे याना जाहीर झाला आहे.या सन्मानाचे वितरण राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे रविवार दि.५ मार्च २३ रोजी दु.१ते ४ या वेळात होणार आहे.या सन्मानबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून अखिल भारतीय सोमवंशीय क्षत्रिय दिगंबर जैन कासार समाज संस्थेचे कोकण विभाग अध्यक्ष दयानंद मांगले यानी त्यांचे अभिनंदन केले आहे.
शिक्षिका तेजश्री भोकरे यांना राज्यस्तरीय नवदुर्गा समाज पुरस्कार जाहीर
