जामसांडे येथील शिवाजी मोहिते यांची देवगड पोलिसांत तक्रार;दोन लाख रुपये घेवून निघाले होते कल्याणला
देवगड
वसई येथून १५ फेब्रुवारी दु १.३० च्या मानाने व्यवहाराचे दोन लाख रुपये घेऊन आपण कल्याणला जातो असे सांगून गेलेला आपला मुलगा प्रदीप शिवाजी मोहिते (३०)हा अद्याप पर्यंत घरी आला नाही अशी फिर्याद शिवाजी परशुराम मोहिते(६५) रा जामसंडे कट्टा यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून तो नापत्ता झाल्याची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.अधिक तपास देवगड पोलीस करीत आहेत.
