Headlines

Global Maharashtra Breaking News

ते पॅचवर्क ठेकेदाराच्या खिशातून मात्र नगराध्यक्षांचे फुकाचे श्रेय:सुशांत नाईक

⚡कणकवली ता.२०-: कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील ते पॅचवर्क शहरातील रस्त्याची कामे करणाऱ्या ठेकेदाराच्या खिशातून झाले असून तेच काम नगराध्यक्ष समीर नलावडे स्वखर्चाने केल्याचे सांगून कणकवली वासीयांच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. मात्र दुसरीकडे दिलीप बिल्डकॉन ठेकेदाराने समीर नलावडे यांच्या हल्लाबोल इशाऱ्याला किंमत दिली नाही. यावर पडदा टाकण्यासाठीच पॅचवर्क स्वखर्चाने केल्याचे नलावडे भासवत आहेत असा…

Read More

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अंतर्गत युवक युवतींना मिळणार रोजगाराभिमुख प्रशिक्षण

विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे साई इन्फोटेक एस एस आय कॉम्प्यूटरचे रघुनाथ तानावडे यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.२०-: येथील ” श्री साई इन्फोटेक ‘एस एस आय’ कॉम्प्युटर सावंतवाडी ” येथे प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२२-२३ या मार्फत जिल्यातील युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मोफत शिकविले जाणार आहे. या…

Read More

साडवली येथील.डॉ केतकी धने यांनी जयपुर नॅशनल युनिव्हर्सिटी, राजस्थान ची डॉक्टरेट पदवी प्रदान!

⚡देवगड ता.२०-: रत्नागिरी जिल्यातील साडवली येथील डॉ. केतकी धने यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये जयपुर नॅशनल युनिव्हर्सिटी, राजस्थान येथे पीएचडी पूर्ण करून डॉक्टरेट ही पदवी मिळवली आहे.या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. डॉ केतकी धने यांनी विशेष कामगिरी करीत असताना सप्टेंबर २०२२ वार्षिक आंतरराष्ट्रीय परिसंवाद असोसिएशन ऑफ फार्मासिटिकल टीचर्स इन इंडिया मार्फत म्हैसूर कर्नाटक…

Read More

देवगडात कासव तर कुणकेश्वर समुद्रावर डॉल्फिन मृतावस्थेत आढळला…

⚡देवगड ता.२०-: येथील समुद्रावर कासव तर कुणकेश्वर समुद्राच्या काठावर डॉल्फिन मासा मृतावस्थेत सापडला आहे. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. याबाबत अधिक माहिती अशी की, तेथील किरण पांचाळ व कल्याणी पांचाळ या दोघांना बीचवर मॉर्निग वॉक करीत असताना एक मृत कासव दिसले. त्यांनी याबाबत तारामुंबरी येथील कांदळवन सहव्यवस्थापन समितीचे सदस्य लक्ष्मण तारी यांनी कळविल्यानंतर तारी…

Read More

टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत केळकर कॉलेज शिक्षकेत्तर कर्मचारी संघ उपविजेता

देवगड (प्रतिनिधी)अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी (सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा – श्री. एस. एच. केळकर कॉलेज देवगड शिक्षकेतर कर्मचारी संघ उपविजेताही क्रिकेट स्पर्धा कुडाळ हायस्कूलच्या भव्य मैदानावर आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये बाळासाहेब खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला, संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळ, कणकवली कॉलेज, स. का. पाटील महाविद्यालय मालवण, एस. पी. के. कॉलेज सावंतवाडी,…

Read More

आयुर्वेद उपचाराचा प्रसार करण्यासाठी आयुर्वेद संस्थान कटिबध्द-:डॉ प्रशांत ससाणे

बांदा ता.२०-:भारतीय आयुर्वेद उपचार पद्धत ही सर्वकालीन श्रेष्ठ पद्धत असून या माध्यमातून आज लाखो रुग्ण निरोगी आयुष्य जगत आहेत. आयुर्वेदचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच याचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना देण्यासाठी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोव्याचे सहाय्यक अधिव्याख्यात डॉ. प्रशांत ससाणे यांनी येथे केले.अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा,…

Read More

आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिराचा शुभारंभ

५०० बाटल्या रक्तसंकलनाचा संकल्प ⚡कणकवली ता.२०-: आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० बाटल्या रक्तसंकलनाचा संकल्प करण्यात आला असून त्यासाठी कुडाळ मालवण तालुक्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी असरोंडी येथे रक्तदान शिबिराचा शुभारंभ आम. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या रक्तदान शिबिरात ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे असरोंडी येथे ५…

Read More

कणकवली टेंबवाडी ते लिंगायत स्मशानभूमी रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ

⚡कणकवली ता.२०-:कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून शहर विकासाचा झंझावत सुरु आहे.कणकवली टेंबवाडी रस्ता ते लिंगायत स्मशानभुमि रस्ता खडीकरण डांबरीकरणकामाचा शुभारंभ दिलीप साटम, नगरसेविका मेघा सावंत, महेश सावंत, संतोष राणे, धीरज साटम आदी मान्यवारांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.नगराध्यक्ष आणी उपनगराध्यक्ष यांच्या माध्यमातून टेम्बवाडी आणि कांबळेगल्ली येथे कोट्यावधीचा निधी देऊन या प्रभागाचा…

Read More

बांदा येथिल शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा…

⚡बांदा ता.२०-: होळी पौर्णिमेपासुन पंधरा दिवसांनी साजरा होणारा बांदा येथिल शिमगोत्सव सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अबालवृद्धांसह महिलांनीही उत्स्फुर्त सहभाग घेत सप्तरंगांची उधळण केली.शिमगोत्सवानिमित्त आदल्या दिवशी रविवारी गांधीचौक मित्रमंडळ व मांडकरी प्रासादिक नाट्यमंडळ निर्मित ‘प्रेम चालू आहे’ हा स्थानिक कलाकारांचा दोन अंकी विनोदी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. सोमवारी सकाळी बांदा बाजारपेठेतील श्री देव मांडकरी…

Read More

ग्रामीण डाकसेवकांचा जाहीर झालेला देशव्यापी संप पुढे ढकलला

⚡मालवण ता.२०-: अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवकांचा १६ व १७ मार्च रोजी जाहीर करण्यात आलेला देशातील तीन लाख कर्मचाऱ्यांचा संप २५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. टपाल खात्याचे डायरेक्टर व दळणवळणमंत्री व संघटनेचे प्रतिनिधी व एस. एस. महादेवय्या यांच्यात यशस्वी बोलणी झाल्यामुळे नियोजित संप पुढे ढकलला गेला आहे, असे संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग ग्रामीण…

Read More
You cannot copy content of this page