प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अंतर्गत युवक युवतींना मिळणार रोजगाराभिमुख प्रशिक्षण

विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे साई इन्फोटेक एस एस आय कॉम्प्यूटरचे रघुनाथ तानावडे यांचे आवाहन

⚡सावंतवाडी ता.२०-: येथील ” श्री साई इन्फोटेक ‘एस एस आय’ कॉम्प्युटर सावंतवाडी ” येथे प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२२-२३ या मार्फत जिल्यातील युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मोफत शिकविले जाणार आहे. या अभ्यासक्रमासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री साई इन्फोटेक ‘एस एस आय’ कॉम्प्युटर सावंतवाडी ,चे श्री रघुनाथ तानावडे यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४५ इतके असले पाहिजे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे. पुढील अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे . 1) Domestic Data Entry Operator (MS. Office, English, Marathi टायपींग) , 2) Account Executive ( Tally Prime ) कोर्से , Guest Service Executive (Front Office) (टूरिझम) या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे.
तरी जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी केंद्राला भेट द्यावी, तसेच अधिक माहितीसाठी 9420740740 या नंबरवर संपर्क साधावा, किवा नोंदणी लिंक https://forms.gle/Tbg5tc3niRoczrk49 फॉर्म भरावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्ता श्री साई इन्फोटेक (SSi COMPUTER) , विठ्ठल मंदिर – मच्छी मार्केट रोड ,युको बँक आणि सावंतवाडी अर्बन बँकच्या मध्ये , द्वारकानाथ कॉम्प्लेक्स , सावंतवाडी

You cannot copy content of this page