⚡देवगड ता.२०-: रत्नागिरी जिल्यातील साडवली येथील डॉ. केतकी धने यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये जयपुर नॅशनल युनिव्हर्सिटी, राजस्थान येथे पीएचडी पूर्ण करून डॉक्टरेट ही पदवी मिळवली आहे.या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
डॉ केतकी धने यांनी विशेष कामगिरी करीत असताना सप्टेंबर २०२२ वार्षिक आंतरराष्ट्रीय परिसंवाद असोसिएशन ऑफ फार्मासिटिकल टीचर्स इन इंडिया मार्फत म्हैसूर कर्नाटक येथे आयोजित चाया पचय संबंधी आजार व त्याच्यावर उपयुक्त औषधी याविषयी उत्तम पोस्टर सादरीकरण, प्रथम पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
ऑक्टोबर २०२२ संजय घोडावत युनिव्हर्सिटी व संशोधन ग्रुप मार्फत आयोजित राष्ट्रीय परिसंवाद द्वितीय पारितोषिक ने सन्मानित करण्यात आले.असून
डिसेंबर २०२२मध्ये ओडिसा येथे इंडो- युनायटेड स्टेट जागतिक परिसंवादामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन, श्रीमती शामसुंदरी मेमोरियल आऊटस्टडींग ओरेशन हा किताब देऊन गौरवण्यात आले आहे.
जानेवारी २०२३ औषध निर्माण शास्त्र क्षेत्रामध्ये मानाची अशी समजली जाणारी संस्था फार्मासिटिकल कौन्सिल ऑफ इंडिया च्या वतीने नागपूर येथे घेण्यात आलेल्या परिसंवादामध्ये तिच्या संशोधनाला तिसऱ्या क्रमांकाचे नामांकन मिळाले असून या सदर कामगिरीची नोंद घेऊन नवभारत राष्ट्रीय ज्ञानपीठ पुणे यांच्यावतीने वूमन प्राईड या किताबाने सन्मानित करण्यात आले .
डॉ. केतकी धने यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये जयपुर नॅशनल युनिव्हर्सिटी, राजस्थान येथे पीएचडी पूर्ण करून डॉक्टरेट ही पदवी मिळवली आहे.अ.भा.सो.दिगंबर जैन कासार समाज संस्था महाराष्ट्र अध्यक्ष पोपटलाल डोर्ले,कोकण विभाग अध्यक्ष दयानंद मांगले रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष अशोक मोहिरे सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.,
डॉ. केतकी यांनी आत्तापर्यंत जवळपास १४ विविध प्रकारच्या नियतकालिकांमध्ये संशोधन सादर केले आहे
तसेच तसेच इन्सुलिन वर आधारित मधुमेही रुग्णांसाठी स्वयंचलितपणे रक्तातील साखर तपासून त्याप्रमाणे इन्सुलिनचा पुरवठा करणारे यंत्र विकसित केले आहे व त्याचे पेटंटही त्यांना मिळाले आहे.
डॉ. केतकी स्वप्नील धने ह्या गेली अकरा वर्षे इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी साडवली येथे अध्यापिका म्हणून कार्यरत होत्या व त्या सध्या डी वाय पाटील युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथील फार्मसी कॉलेज येथे असोसिएट प्रोफेसर, व युनिव्हर्सिटी येथे बोर्ड ऑफ स्टडी या उच्च पदावर कार्यरत आहेत.
यापुढेही डी वाय पाटील कोल्हापूर येथील हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज येथील संशोधन विभाग यांच्या मदतीने विविध अंगी संशोधन करण्याचा त्यांचा मानस आहे.
