आयुर्वेद उपचाराचा प्रसार करण्यासाठी आयुर्वेद संस्थान कटिबध्द-:डॉ प्रशांत ससाणे

बांदा ता.२०-:
भारतीय आयुर्वेद उपचार पद्धत ही सर्वकालीन श्रेष्ठ पद्धत असून या माध्यमातून आज लाखो रुग्ण निरोगी आयुष्य जगत आहेत. आयुर्वेदचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच याचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना देण्यासाठी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोव्याचे सहाय्यक अधिव्याख्यात डॉ. प्रशांत ससाणे यांनी येथे केले.
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा, स्वामी विवेकानंद संस्था, कडशी मोपा व रोटरी क्लब ऑफ बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आनंदी मंगल कार्यालयात मोफत आयुर्वेद आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. या शिबिराचा सुमारे ३०० हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी सर्व तपासण्या व औषधे रूग्णांना मोफत देण्यात आली.
या शिबिरात हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, लिव्हर, किडनी विकार, एलर्जी व दमा श्वसन विकार, त्वचा विकार हाडांचे व सांध्यांचे आजार, पक्षाघात वातविकार, मुळव्याध थायरॉईड, बालरोग, स्त्रीरोग तसेच अन्य जुनाट विकारावर उपचार करण्यात आले. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉ. प्रशांत ससाणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर बांदा रोटरी क्लबचे अध्यक्ष मंदार कल्याणकर, स्वामी विवेकानंद कला क्रीडा संस्था कडशी मोपाचे उपाध्यक्ष उमेश गाड, रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर सौ. निता गोवेकर, पास्ट एजी राजेश घाटवळ, जीएसआर आनंद रासम, बांदा सरपंच प्रियांका नाईक, रोटरीचे उपाध्यक्ष प्रमोद कामत, सचिव फिरोज खान, बांदा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, कार्यक्रम प्रमुख आपा चिंदरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद भिडे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत आपा चिंदरकर यांनी केले. यावेळी सरपंचा श्रीमती नाईक, डॉ. ससाणे, पंचकर्मतज्ञ डॉ. स्वप्नील औटी, शरीरसरचना तज्ञ डॉ. श्रीजील कृष्णन, शल्यचिकित्सक डॉ. फोरम जोशी, स्त्रीरोग प्रसुतीतज्ञ डॉ. दीपा शिरोडकर, योगा थेरपिस्ट डॉ. मोहिनी मेती, औषध निर्माता भक्ती चव्हाण, परिचारिका प्रिया पेडणेकर, सिद्धेश आईर, यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. डॉ. जगदीश पाटील यांच्या सहकार्याने या शिबिराच्या अगोदर तीन दिवस सुमारे ६८ रुग्णांची मोफत रक्त तपासणी केली गेली. या तपासणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या श्वेता वराडकर हिचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आला.
डॉ. प्रशांत ससाणे यांनी भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा याबद्दल उपस्थितांना माहिती दिली व या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना कोणत्या सेवा मिळतात याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी नीता गोवेकर, प्रियांका नाईक, प्रमोद कामत, उमेश गाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास रोट्रॅक्ट क्लब ऑफ बांदाचे सहकार्य लाभले. बांदा रोटरीचे खजिनदार बाबा काणेकर, सदस्य आबा धारगळकर, प्रवीण शिरसाट, सुधीर शिरसाट, डॉ. प्रसाद कोकाटे, स्वप्निल धामापूरकर, दिगंबर गायतोंडे, रत्नाकर आगलावे, संदीप देसाई, संतोष सावंत, शितल राऊळ, दिलीप कोरगावकर, सुनील राऊळ, स्वागत नाटेकर, तुषार धामापूरकर, विशाल मळेवाडकर, योगेश परुळेकर, सिताराम गावडे, सचिन मुळीक, सुदन केसरकर, संजय शिरोडकर, मनसुख वासानी-पटेल आदी उपस्थित होते. २६ मार्च रोजी जिल्हा परिषद शाळा सभागृह इन्सुली व 2 एप्रिल रोजी नेतर्डे येथे अशाच प्रकारची मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष मंदार कल्याणकर यांनी दिली. आभार आपा चिंदरकर मानले.
फोटो :-
बांदा येथे मोफत महाआरोग्य शिबिरात बोलताना अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे डॉ. प्रशांत ससाणे. सोबत इतर मान्यवर.
फोटो :-
बांदा येथे उपस्थित असलेले रुग्ण व ग्रामस्थ. (छायाचित्रे – निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page