देवगड (प्रतिनिधी)
अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी (सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा – श्री. एस. एच. केळकर कॉलेज देवगड शिक्षकेतर कर्मचारी संघ उपविजेता
ही क्रिकेट स्पर्धा कुडाळ हायस्कूलच्या भव्य मैदानावर आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये बाळासाहेब खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला, संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळ, कणकवली कॉलेज, स. का. पाटील महाविद्यालय मालवण, एस. पी. के. कॉलेज सावंतवाडी, आनंदीबाई रावराणे कॉलेज वैभववाडी, कला वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट, श्री. एस. एच. केळकर कॉलेज देवगड, लक्ष्मीबाई हळबे कॉलेज दोडामार्ग, गोगटे वाळके कॉलेज पानवळ बांदा ईत्यादी जिल्ह्यातील एकूण दहा संघ सहभागी झाले होते.
उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या कामगिरीमुळे केळकर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचारी संघाने फायनल पर्यंत मजल मारली. देवगड कॉलेजचा पहिला सामना लक्ष्मीबाई हळबे कॉलेज दोडामार्ग बरोबर होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दोडामार्ग संघाने पाच षटकांत ४९ धावांच खडतर आव्हान ठेवले होते परंतु . प्रशांत तेली यांनी २१ धावा करत संघाला अवघ्या चार षटकांत मध्येच सामना जिंकून दिला त्यामुळे सामनावीर म्हणुन त्यांना गौरविण्यात आले. त्यानंतर सेमीफायनलचा सामना एस. पी. के. कॉलेज सावंतवाडी यांच्या सोबत खेळताना विजयासाठी देवगड कॉलेजच्या संघाने 60 धावांचे आव्हान दिले होते. या अटीतटीच्या सामन्यात सामना सावंतवाडीच्या बाजूने झुकत असताना पंकज जाधव यांनी लागोपाठ उत्कृष्ट झेल टिपत आणि दोन धावबाद करत सामना देवगडच्या बाजूने वळवला. या सामन्यात . अनिकेत कोयंडे याला उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीर म्हणुन गौरविण्यात आले. आता शेवटाचा फायनल सामना कणकवली कॉलेज मध्ये होता. या सामन्यात कणकवली कॉलेजने विजयासाठी सहा षटकांत १२४ धावांची खडतर असे आव्हान ठेवले होते या सामन्यात देखील विजयासाठी झुंज देत देवगड कॉलेजच्या संघाने ७४धावा पर्यंत मजल मारली आणि उपविजेता संघ म्हणुन नाव कोरले.
देवगड कॉलेज च्या शिक्षकेतर कर्मचारी संघाने उपविजेतेपद पटकावून देवगड कॉलेज ला रोख रक्कम ३०००/- रुपये आणि एक चषक मिळवून दिले. श्री. पंकज जाधव त्यांनी केलेल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणुन गौरविण्यात आले. या सर्व कर्मचाऱ्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुखदा जांबळे, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्था पदाधिकारी यांनी कौतुक केले आहे.
