⚡बांदा ता.२०-: होळी पौर्णिमेपासुन पंधरा दिवसांनी साजरा होणारा बांदा येथिल शिमगोत्सव सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अबालवृद्धांसह महिलांनीही उत्स्फुर्त सहभाग घेत सप्तरंगांची उधळण केली.
शिमगोत्सवानिमित्त आदल्या दिवशी रविवारी गांधीचौक मित्रमंडळ व मांडकरी प्रासादिक नाट्यमंडळ निर्मित ‘प्रेम चालू आहे’ हा स्थानिक कलाकारांचा दोन अंकी विनोदी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. सोमवारी सकाळी बांदा बाजारपेठेतील श्री देव मांडकरी देवस्थान येथे सकाळी वार्षिक धार्मिक कार्यक्रमांना आरंभ झाला. यावेळी देवाला नारळ व गुलाल अर्पण करण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील वाडीवाडीत, गल्लोगल्ली तसेच घरोघरी दिवसभर सर्वांनी रंगोत्सव साजरा केला. काही ठिकाणी ढोल ताशे तर काही ठिकाणी डिजे च्या तालावर लोकांनी नृत्याचा आनंद लुटला.
बांदा येथिल शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा…
