आंबोली,ता.30 येथील आंबोली आजरा फाट्याच्या पुढच्या वळणावर ओमनी गाडी आणि दुचाकी यांच्यात जोरदार अपघात झाला.अपघातात ओमनी गाडी समोरच्या दिशादर्शक फलकावर जोरदार आदळली. यात गाडी चालकाचा पाय अडकून गंभीर जखमी झाला.तर दुचाकी स्वार ही जखमी झाला.जखमी ना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.प्रदीप पोतदार यांनी उपचार करण्यात केले.यानंतर आंबोली पोलीस घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी गेले आहेत.
आंबोली-आजरा फाट्यावर ओमनी-दुचाकीची जोरदार धडक; दोघे जखमी…
