Headlines

Global Maharashtra Breaking News

प्रत्येकाने रक्तदान करणे गरजेचे

माजी सरपंच प्रकाश गावडे : मडुरा-रोणापाल तिठा येथे रक्तदान शिबिरास प्रतिसाद ⚡बांदा ता.०२-: रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान असून प्रत्येकाने रक्तदान करून एक जीव वाचविण्याचा नेहमी प्रयत्न करावा. आपल्यावर गतकाळात ओढावलेला प्रसंग कथन करत रक्तदानाचे महत्त्व गावडे यांनी पटवून दिले. तसेच रक्तदान शिबिराचा उपक्रम सदैव राबवावा असे आवाहन, रोणापाल माजी सरपंच तथा तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश…

Read More

तीलारीचे पाणी अखेर इन्सुलित

बांदातिलारीचे पाणी बांदा वाफोलिच्या पुढे येईल की नाही हा प्रश्न शेतकऱ्यांना होता. त्यामुळे इन्सुली सह निगुडे, रोणापाल ग्रामस्थांनी आंदोलने करण्याचा इशारा दिला होता. इशाऱ्यानंतर संबंधित विभागाला जाग आल्याने विलवडे येथे सुरू असलेले काम लवकरात लवकर आटोपून पाणी जलदगतीने सोडले. शनिवारी मध्यरात्री इन्सुलीत पाणी दाखल झाल्याने इन्सुली ग्रामस्थामधून समाधान व्यक्त होत आहे. तर सर्वच स्तरातून तिलारी…

Read More

राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश सचिव शिंदे यांची राष्ट्रवादी कार्यालयाला भेट

पक्ष वाढविण्यासाठी लागेल ती ताकद देण्याची दिली ग्वाही ⚡सावंतवाडी ता.०२-: महाराष्ट्र प्रदेश सचिव विठ्ठलराव शिंदे यांनी आज येथील राष्ट्रवादी कार्यालयाला भेट दिली. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्याच्यासोबत साहेबराव कारके, सुनील ढोरे, संजय बावीस्कर उपस्थित होते. दरम्यान तालुक्यात राष्ट्रवादी जोमाने वाढवा लागेल ती ताकद देऊ असा शब्द शिंदे यांनी श्री दळवी…

Read More

काजू बोंडू प्रशिक्षण संपन्न

⚡वेंगुर्ला ता.०२-: डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठ दापोलीअंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला व कॅश्यू फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने काजू बोंडू प्रात्यक्षिकासहीत एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा झाली.

Read More

मेळाव्यातून विवाह गाठ बांधली जावी – एस.आर.डौर

⚡वेंगुर्ला ता.०२-: वधूवर सुचक मेळावा हा स्तुस्त्य उपक्रम आहे. लाभार्थ्यांनी आपला जोडीदार निवडताना दोन पाऊले मागे व दोन पाऊले पुढे येऊन निर्णय घेतला तर वधूवर मेळाव्याची खरी फलश्रुती होईल. या मेळाव्यातून जिल्ह्यातील युवक युवतींची विवाह गाठ बांधली जावी अशी अपेक्षा नागरी हक्क संरक्षण विभाग सिधुदुर्गचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.आर.डौर यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली.

Read More

नांदगाव येथे 3 एप्रिलला 25% , 35% सबसिडी कर्ज प्रस्ताव मार्गदर्शन मेळावा

⚡कणकवली ता.०२-: कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत नांदगाव आणि किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव ग्रामपंचायत सभागृह येथे आज सोमवार 3 एप्रिल 2023 रोजी दुपारी 3 वाजता शासनाच्या वतीने जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सबसिडी कर्ज प्रस्ताव करण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.यावेळी या कर्ज प्रस्ताव करण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागतात. तसेच 5 लाख रुपये ते…

Read More

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल 3 एप्रिल रोजी जाहीर होणार

परीक्षेसाठी जिल्हा भरातून ७५४२ विद्यार्थी प्रविष्ठ ⚡कणकवली ता०२-: युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ – सांगवे आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रत्नांचा शोध घेणारी सिंधुरत्न टॅलेंट सर्च 2023 परीक्षेचा निकाल सोमवार 3 एप्रिल 2023 रोजी दुपारी 3 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. यावर्षी युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ – सांगवे आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च 2023 परीक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ परीक्षा…

Read More

नांदगाव येथे हनुमान जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा

⚡कणकवली ता.०२-: कणकवली तालुक्यातील श्रीराम मंदिर नांदगाव मोरयेवाडी, बिडयेवाडी येथे श्री हनुमान जयंती निमित्त गुरुवार 6 एप्रिल 2023 रोजी रात्री ठीक 9 वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बाल गट 12 वर्षांपर्यंत अनुक्रमे 2,000 हजार ,1,500 हजार,1,000 हजार तसेच उत्तेजनार्थ 500 रुपये तर खुला गट 12 वर्षांवरील अनुक्रमे 2,000 हजार ,1,500 हजार,1,000…

Read More

आम. नितेश राणे 16 एप्रिल रोजी भरवणार देवगडात भव्य मिसळ महोत्सव

कोल्हापूर पुणेसह राज्यातील चटकदार मिसळची चव मिळणार खवय्यांना ⚡कणकवली ता.०२-: आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड शहरात रविवार दिनांक 16 एप्रिल रोजी देवगड कॉलेज नाका, डॉ. सावंत कंपाउंड येथे भव्य मिसळ महोत्सव भरवण्यात येणार असून कोल्हापूर, पुणे सह राज्यभरातील नामांकित मिसळ ची चव देवगड वासीय आणि पर्यटक खवय्यांना चाखता येणार आहे. आमदार नितेश राणे यांच्या…

Read More

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा 5 एप्रिलला कणकवली शहरात येणार

⚡कणकवली ता.०२-: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानार्थ संपूर्ण महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रा सुरू आहे. या यात्रेचे आगमन बुधवार 5 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता कणकवली शहरात होत आहे. या यात्रेचे भव्य स्वागत आमदार नितेश राणे करणार आहेत. या यात्रेचा भव्य दिव्य स्वागत समारंभ आमदार नितेश राणे यांनी योजला आहे. या स्वागत समारंभात सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई या…

Read More
You cannot copy content of this page