स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा 5 एप्रिलला कणकवली शहरात येणार

⚡कणकवली ता.०२-: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानार्थ संपूर्ण महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रा सुरू आहे. या यात्रेचे आगमन बुधवार 5 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता कणकवली शहरात होत आहे.

या यात्रेचे भव्य स्वागत आमदार नितेश राणे करणार आहेत. या यात्रेचा भव्य दिव्य स्वागत समारंभ आमदार नितेश राणे यांनी योजला आहे. या स्वागत समारंभात सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई या संस्थेच्या सहकार्याने भव्य रंगमंचावर सावरकर लिखीत पोवाडे, छत्रपती शिवाजी महाराजांची आरती, क्रांती गीते, हिंदु गौरव गीते यावर आधारित “सावरकर गौरव ” हा कार्यक्रम कणकवली शिवाजी चौक येथे सादर होणार आहे. सावरकर प्रतिष्ठानचे नामवंत कलाकार हा कार्यक्रम सादर करतील. सावरकरांचे राष्ट्रवादी विचार, हिंदु तत्वज्ञान घरा घरात पोहचावे म्हणून आमदार नितेश राणे जोरदार प्रयत्न करत आहेत.

या सावरकर गौरव यात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे अवाहन आम. नितेश राणे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page