⚡कणकवली ता.०२-: कणकवली तालुक्यातील नांदगाव ओटव माईण रस्ता शेटये दुकान ते गगनग्रास घर जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन भाजपाचे कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे. आमदार नितेश राणे यांच्या स्थानिक विकास निधीतून हा रस्ता मंजूर करण्यात आला असून
या उद्घाटन प्रसंगी महीला तालुकाध्यक्षा हर्षदा वाळके , तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर,माजी सरपंच संजय पाटील, हनुमंत वाळके, ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर, विनोद मोरये, पुजा सावंत, अक्षता खोत,अनिकेत तांबे,जैबा नावलेकर, संतोष बिडये,शरु गगनग्रास , कमलेश पाटील, सुरेश मोरजकर, मंगेश बोभाटे, मंगेश मोरये आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
नांदगाव येथे रस्त्याचे केले भूमिपूजन
