वादळी वाऱ्याने उडाले दुकानाचे पत्रे

मळगाव ब्राम्हणघाट येथील दुपारची घटना;दुकानदार देवदास नाईक यांचे हजारोंचे नुकसान

सावंतवाडी । प्रतिनिधी : झाराप पत्रादेवी बायपासलगत मळगाव ब्राम्हणपाट सर्कल जवळ असलेल्या दुकान गाळ्यांचे पत्रे अचानकपणे आलेल्या वादळी वार्‍याने उडाले. शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात मळगाव पिंपळवाडी येथील देवदास सोनू नाईक यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
देवदास नाईक यांचे मुंबई गोवा महामार्गाच्या झराप पत्रादेवी बायपास लगत मळगाव ब्राम्हणपाट सर्कल जवळ दुकान गाळे आहेत. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास अचानकपणे आलेल्या चक्रीवाऱ्याने त्यांच्या या दुकान गाळ्यांवरील पत्रे उडून गेले. त्यामुळे त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यावेळी त्या ठिकाणी कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. त्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

You cannot copy content of this page