स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर शरद पोंक्षे यांचे मालवणात व्याख्यान

⚡मालवण ता.०१-: विश्व हिंदू परिषद मालवण प्रखंडाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्यक्तिमत्वावर सावरकर विषयाचे अभ्यासक व जहाल वक्ते सिने नाट्य अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांचे व्याख्यान मंगळवार ४ एप्रिल सायंकाळी ४:३० वाजता मामा वररेकर नाट्यगृह मालवण येथे आयोजित केले आहे.

देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांना परकीय सत्तेने अतोनात छळ करून त्यांचे कुटुंबीय व सहकारी यांना त्रास दिला. हा इतिहास व वस्तुस्थिती असताना स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी देशभक्त सावरकर यांचा सन्मान करण्या ऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अनेक प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः काँग्रेस विचारसरणीचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या देशभक्तीवर अनेकवेळा प्रश्न उपस्थित केले. आतातर माफीवीर सावरकर अश्या बिरुदावलीने प्रचार आणि प्रसार काँग्रेस विचारसरणी करत आहे.

देशभक्त नागरिकांचा सन्मान व आपली संस्कृती पोषक कार्यक्रमांचे आयोजन करणे हे विश्व हिंदू परिषदेचे धोरण असल्याने स्वतंत्रवीर सावरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे. तरी ४ एप्रिल सायंकाळी ४:३० वाजता मामा वरेरकर नाट्यगृह येथील कार्यक्रम साठी देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सावरकर विषय समजून घेत पुढच्या पिढीला सावरकर यांचा जाज्वल्य इतिहास जागृत ठेवण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन विश्व हिंदू परिषद मालवणच्या वतीने भाऊ सामंत व संदीप बोडवे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page