⚡मालवण ता.०१-: मालवण मेढा येथील रहिवासी आणि आनंद कमर्शीयल टेलरिंग क्लासेसचे शिक्षक व सर्वेसर्वा आनंद उर्फ भाई हरी कोचरेकर (वय ५६) यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात उपचारदरम्यान निधन झाले. एक उत्तम टेलर व्यावसायिक व टेलरिंग शिक्षक म्हणून ते परिचित होते.
मेढा येथील आपल्या टेलरिंग क्लासेसद्वारे त्यांनी अनेकांना टेलरिंगचे शिक्षण देत स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
