⚡कणकवली ता.०२-: कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत नांदगाव आणि किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव ग्रामपंचायत सभागृह येथे आज सोमवार 3 एप्रिल 2023 रोजी दुपारी 3 वाजता शासनाच्या वतीने जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सबसिडी कर्ज प्रस्ताव करण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी या कर्ज प्रस्ताव करण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागतात. तसेच 5 लाख रुपये ते 50 लाखा पर्यंत कर्ज उपलब्ध आहेत. महीलांसाठी 35% तर पुरुषांना 25% सबसिडी आहेत. तर ओबीसी दाखला असेल तर युवकांना ही 35% सबसिडी असणार आहे याची सविस्तर माहिती मिळण्यासाठी न चुकता नांदगाव ग्रामपंचायत येथे आज सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी दुपारी ठीक 3 वा. उपस्थित राहावे. असे आवाहन नांदगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
नांदगाव येथे 3 एप्रिलला 25% , 35% सबसिडी कर्ज प्रस्ताव मार्गदर्शन मेळावा
