माजी सरपंच प्रकाश गावडे : मडुरा-रोणापाल तिठा येथे रक्तदान शिबिरास प्रतिसाद
⚡बांदा ता.०२-: रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान असून प्रत्येकाने रक्तदान करून एक जीव वाचविण्याचा नेहमी प्रयत्न करावा. आपल्यावर गतकाळात ओढावलेला प्रसंग कथन करत रक्तदानाचे महत्त्व गावडे यांनी पटवून दिले. तसेच रक्तदान शिबिराचा उपक्रम सदैव राबवावा असे आवाहन, रोणापाल माजी सरपंच तथा तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश गावडे यांनी केले.

श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ, रोणापाल यांच्यावतीने आयोजित रोणापाल माजी सरपंच प्रकाश गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त सावित्री शंकर मंगल कार्यालय रोणापाल मडुरा तिठा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. गावडे बोलत होते. व्यासपीठावर श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा रोणापाल माजी सरपंच प्रकाश गावडे, पाडलोस उपसरपंच राजू शेटकर, बांदा प्राथमिक आरोग्य केद्रांचे डाँ. मयुरेश पटवर्धन, रोणापाल पोलीस पाटील निर्जरा परब, शेर्ले माजी सरपंच उदय धुरी, मडुरा माजी उपसरपंच उल्हास परब, रोणापाल शाखाप्रमुख मंगेश गावडे, जीवनधारा ब्लड सेंटर कोल्हापूरचे डाँ. विशाल नाईक, देवस्थान मानकरी परशुराम गावडे, ग्रा.प. सदस्य नंदकीशोर नेमण, रोणापाल माजी सरपंच उदय देऊलकर, रक्त सिंधू प्रतिष्ठान सिंधुदुर्ग सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष मंगल कामत, सामजिक कार्यकर्ते सुदिन गावडे शिवसेना विभाग प्रमुख (शिंदे गट) राजन परब, सांस्कृतिक मंडळाचे खजिनदार बाबल तुयेकर, सचिव विष्णू सावंत, मडुरा सोसायटी माजी चेअरमन अशोक कुबल आदि मान्यवर उपस्थित होते. यानंतर प्रकाश गावडे यांचा वाढदिवस सर्वांच्या केक कापून उपस्थितीत संपन्न झाला. एकूण ३२ रक्तदात्यांनी शिबीरात रक्तदान केले.
मडुरा पंचक्रोशीतील नागरिकांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये महीला वनिता गावडे यांनी प्रथम रक्तदान केले. यापूर्वी ही सांस्कृतिक मंडळातर्फे गावात अनेक विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. गावातील व जिल्ह्यातील रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास भविष्यात मंडळातर्फे रक्त उपलब्ध होईल अन रुग्णाला योग्यवेळी रक्तपुरवठा करता येईल. या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे मित्रमंडळाकडून सांगण्यात आले.
सांस्कृतिक मंडळाचे खजिनदार बाबल तुयेकर, उदय गावडे, दिलीप नाईक, विष्णू सावंत , निलेश नाईक, सुशांत गावडे, डाँ. विशाल नाईक जीवनधारा ब्लड सेंटर कोल्हापूर रक्त विघटन, व अफेरेसिस सेंटर कोल्हापूर यांनी तसेच रक्त सिंधू प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी रक्तदान शिबिरासाठी सहकार्य केले.
दु:खत प्रसंगातही केले रक्तदान!
दु:खत प्रसंग असुनही रक्तदान करुन नारायण नाईक यांनी दिला समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. आपल्यावर व कुटुंबावर कोसळलेल्या दुःखद प्रसंगीही आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूने रोणापाल येथील नारायण नाईक या युवकाने रक्तदान केले. जन्मदाती आई हीचे दोन दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असे असूनही समाजात एक नवा आदर्श देत नारायण नाईक व कुटुंबातील सिद्धेश नाईक, कल्पेश नाईक, प्रथमेश नाईक (यांच्या त्या काकी) सदस्यांनी सुद्धा शिबिरात येत रक्तदान केले. या कुटुंबीयांचे मंडळाकडून व पंचक्रोशीतून कौतुक करण्यात आले.
