कणकवली शहरातील समस्यांबाबत शिवसेना नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
मागण्या ८ दिवसात पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ⚡कणकवली ता.१६-: कणकवली शहरातील समस्यांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, योगेश मुंज यांनी कणकवली नगरपंचायतचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची भेट घेत शहरातील समस्या सोडविण्याबाबत निवेदन दिले. त्यामध्ये श्रीधर नाईक उद्यानामध्ये लाईट व्यवस्था करणे, जेसीबीच्या सहाय्याने नाथ पै नगर गणपती साना…
