⚡मालवण ता.१५-: मसुरे डांगमोडे येथील प्राथमिक विद्यामंदिरच्या शतवार्षिकोत्सवात रात्री विद्यार्थांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आपल्यातील अंगभूत कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळविली. तर या शतवार्षिकोत्सवात विद्यार्थ्यांबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. रविवारी उत्तर रात्रीपर्यंत रंगलेल्या या कार्यक्रमात दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला एकूणच रविवारची रात्र मसुरे डांगमोडे वासियांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे यादगार बनली.
मालवण तालुक्यातील मसुरे डांगमोडे येथील प्राथमिक विद्यामंदिरचा शतवर्षिकोत्सव रविवारी विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. प्रशालेच्या या शतवर्षिकोत्सवाच्या निमित्ताने प्रशालेत विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय विभाग सुरु करण्यात आला. शतवर्षिकोत्सवाचा उदघाटनाचा समारंभ पार पडल्यानंतर प्रशालेच्या च्या आजी माजी विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यात रेकॉर्ड डान्स, ग्रुप डान्स, कोळीनृत्य, हिंदी मराठी गाण्यावरील नृत्य, नाट्य छटा, मिमिक्री सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
या शतवार्षिकोत्सवाच्या निमित्ताने गावातील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यात सुरेंद्रनाथ ठाकूर, काशिनाथ भिकाजी ठाकूर, पार्वती शंकर दीक्षित, सुनंदा एकनाथ ठाकूर, सुशीला राघू ठाकूर, कल्याण दिनकर ठाकूर, अशोक जगन्नाथ ठाकूर, अनाजी जगन्नाथ ठाकूर, शैलजा मधुसूदन ठाकूर, सौ. ठाकूर, विलास भागोजी ठाकूर, राघो मोतीराम ठाकूर, अरुण सहदेव ठाकूर, रविकांत जनार्दन ठाकूर, दत्तात्रय भागोजी ठाकूर, बाळप्रकाश अंकुश ठाकूर, सुलभा यशवंत ठाकूर, मधुसूदन डांगमोडेकर, सखाराम हिंदळेकर, मायावती कदम, सिंधू धाकू बाईत, अंकुश तुकाराम ठाकूर, पुष्पावती नरहरी ठाकूर, बाळा मेस्त्री, आबा पेंडूरकर, प्रकाश भिवा ठाकूर, दत्ताराम कदम यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांचा बाळ प्रकाश ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी राजेंद्र विठ्ठल ठाकूर आणि हेमंत विठ्ठल ठाकूर या बंधूनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यात राजेंद्र ठाकूर यांनी लिहिलेल्या ‘श्री देव रवळनाथ… डांगमोडे’ आणि ‘फांदीवरले पक्षी’ हा कविता संग्रह तसेच हेमंत ठाकूर यांचे ‘सिंधुदुर्गनगरी’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. रात्रौ दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.
