रामगड देसाईवाडा जाणाऱ्या रस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत झाले भूमिपूजन

⚡मालवण ता.१५-: कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून २५/१५ ग्राम विकास निधी अंतर्गत रामगड येथील श्री. विठ्ठल रखुमाई मंदिर ते देसाईवाडा जाणाऱा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या कामासाठी ५ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन रविवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत व ज्येष्ठ ग्रामस्थ सखाराम घाडीगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

रामगड गावात आ.वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून अनेक विकास कामे मंजूर झाली असून येत्या काळात त्या कामांना ही सुरुवात केली जाणार आहे.उर्वरित प्रलंबित कामे देखील मंजूर करण्याचे आश्वासन आ.वैभव नाईक यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी रामगड सरपंच शुभम मटकर, उपसरपंच राजू जाधव,माजी सरपंच विलास घाडीगावकर, ग्रा.प. सदस्य अमित फोंडके,ग्रा.प. सदस्या स्वानंदी सादये, शाखाप्रमुख रामू सादये,युवासेना शाखा प्रमुख गणेश पराडकर,जयराम परब, किशोर पारकर, दिलीप पारकर, विजय कामतेकर,भरत हडकर,रिमा पारकर, वैभवी मालोंडकर,श्री.नारकर आदिंसह शिवसेना पदाधिकारी, रामगड ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page