हेल्मेट वापराबाबत मालवणात परिवहन अधिकाऱ्यांतर्फे जनजागृती
⚡मालवण ता.०३-: मोटर वाहन कायद्यान्वये विनाहेल्मेट मोटरसायकल चालविणे किंवा चालविण्यास संमती देणे अशा दोघांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद या कायद्यात आहे. याबाबत गुरुवारी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांतर्फे मालवणातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये संबंधित कार्यालयप्रमुखांना माहिती देऊन कार्यवाही करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले. मालवण तहसील कार्यालय येथे तहसीलदार वर्षा झालटे यांना याबाबत माहिती देऊन…
