⚡सावंतवाडी ता.०३-: खासदार संजय राऊत यांच्या विरोधात येथील शिवसेनेने शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर जोडे मारा आंदोलन छेडले. शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी व तालुका प्रमुख नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलने छेडण्यात येत आहेत.
मंत्री दिपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर सावंतवाडी मध्ये जोडे मारा आंदोलन छेडण्यात आले.
या आंदोलनामध्ये जिल्हाप्रमुख अशोक दळवी ,तालुकाप्रमुख नारायण राणे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, गुंडू जाधव, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष राजन रेडकर, आबा केसरकर ,प्रकाश गावडे ,दया परब, गजानन नाटेकर ,शशिकांत गावडे ,नंदू शिरोडकर,अब्जू सावंत, संदेश सोनुर्लेकर, सुरेंद्र बांदेकर, संजय माजगावकर ,बापू कोठावळे, राजन परब, लाडु जाधव, संजय गावडे, एकनाथ हळदणकर, नरेंद्र मिठबावकर व शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
