कणकवलीत खास.संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्यावतीने केला निषेध

⚡कणकवली ता.०३-: खासदार संजय राऊत यांनी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेताच पत्रकार परिषदेमध्ये थुकण्याच्या केलेल्या प्रकाराचा निषेध सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्यावतीने करण्यात आला.

खास.संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.
कणकवलीतील शिवसेना कार्यालयाजवळ खासदार संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी संजय राऊत यांचा निषेध देखील करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, संदेश पटेल, भास्कर राणे, निलेश तेली, सुनील पारकर, बाळू पारकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page