दिगवळे येथील रांजणवाडी व स्वयंभू मंदिर रस्त्याचे उद्धाटन

जिल्हाप्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती

कणकवली ता.०३-: दिगवळे रांजणवाडी या रस्त्याची सर्वच ग्रामस्थांना प्रतीक्षा लागली होती. तो 2.5 किमी चा रस्ता शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे डांबरीकरण करण्यात आला या रस्त्याचे उद्धाटन जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले. त्याच बरोबर अनेक वर्षे प्रलिंबित असलेला स्वयंभू मंदिर कडे जाणारा 50 मिटर रस्ता तो काही शासकीय कारणास्तव होत नसल्याने शासकीय ठेकेदार रामदास विखाळे यांनी स्वखर्चातून तो त्याच वेळी करून दिला त्याचे उद्धाटन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. डांबरीकरण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे दिगवळे गावातील नागरिकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.


या उद्धाटन प्रसंगी दिगवळे गावचे सरपंच संतोष घाडीगावकर, शिवसेना विभागप्रमुख आनंद आचरेकर, युवासेना विभागप्रमुख संतोष सावंत, ग्रामपंचायत सदस्य बाळू गावडे व शामसुंदर जाधव, स्वयंभू देवस्थान कमिटीचे अध्यक्ष नाना गावडे, ह.भ.पं. संदीप चव्हाण बुवा तसेच गावातील असंख्य ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page