सावंतवाडीत रात्रीचे गवा रेड्याची गस्त…

नागरिकांत भीतीचे वातावरण: वन विभागासमोरील प्रकार

सावंतवाडी ता.०३-:काल परवा पर्यंत जंगल किंवा ग्रामीण भागातील वस्तीत फिरताना दिसणारा गवा रेडा चक्क सावंतवाडी वस्तीत फिरताना नागरिकांना आढळून आला आहे. रात्रौच्या वेळी एक गवा रेडा सावंतवाडी वन विभागा समोरील रस्ता क्रॉस करताना दिसल्याने तेथील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गवा रेडा थेट लोकवस्तीत फिरू लागल्याने नागरिकांना काळजी घेवून घराच्या बाहेर पडावे लागणार आहे.

You cannot copy content of this page