Headlines

घोषवाक्य स्पर्धेचे ३१ ऑगस्टला बक्षीस वितरण

बॅ नाथ पै कॉलेज एमआयडीसी येथे आयोजन

कुडाळ : दत्ताविष्कार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग आरंभ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आस्था फाऊंडेशन, कुडाळ, (सिंधुदुर्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय घोषवाक्य स्पर्धेचा
बक्षिस वितरण समारंभ सोमवार ३१ ऑगस्ट रोजी  दुपारी ३ वाजता बॅ. नाथ पै कॉलेज एम आय डी सी कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. ज्ञान, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही राज्यस्तरीय घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती
या सोहळ्याला कुडाळच्या नगराध्यक्ष श्रीमती प्राजक्ता बांदेकर,  बॅ. नाथ पै संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, दत्ताविष्कार फाऊंडेशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष अमोल चव्हाण, केंद्रप्रमुख गोविंद चव्हाण, कार्याध्यक्ष सेवानिवृत्त कर्मचारी संघटना धोंडू रेडकर, डॉट कॉम असोसिएशनचे अध्यक्ष संजय बगळे, त्रिमूर्ती संगीत विद्यालय संचालक डॉ. राहुल गव्हाणकर, श्रीमती स्वप्नाली सावंत, श्रीमती सायली शिरोडकर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उदय शिरोडकर,  वैभव परब, आनंदा वरूटे, मारूती गुंजाळ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page