सहकार प्रशिक्षण कार्यक्रमात ट्रॉलर व्यवसायिकांनी मांडली डिझेल परताव्याची व्यथा
⚡मालवण ता.२६-: डिझेल परताव्याचे हक्काचे पैसे मच्छिमारांच्या हाती येण्यास वारंवार विलंब होतोय. परतावा मंजूर झाला, तरी त्यात सिंधुदुर्गचा वाटा अत्यल्प असतो. जून महिन्यात जिल्ह्यासाठी केवळ ३९ लाख रुपये मंजूर झाले आहेत. अशा परिस्थितीत ट्रॉलर व्यावसायिकांनी मासेमारी बंदी कालावधीत नौका आणि इंजिनची देखभाल-दुरुस्तीची कामे करायची कशी, अशी कैफियत सहकार प्रशिक्षण कार्यक्रमात राजकोट मच्छीमार सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष…
